नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व ब्राह्मणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी ….
केरळ मध्ये जेवणं केळीच्या पानावर का देतात ?
केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली असलेली पोषकतत्वे अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते. केळीच्या पानवर जेवण केल्यास डाग- खाज , पुरळ , फोडं अशा समस्या दूर होतात. केळीच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात “एपिगालोकेटचीन गलेट” आणि इजीसीजीसारखे “पॉलिफिनोल्स अँटिऑक्सीडेंट ” आढळतात.
केळीच्या पानावर जेवणं का ठरते आरोग्यदायी ?
केळीचं पान आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते स्वच्छ आणि आरोग्यसाठी फायदेशीर आहे. केळीच्या पानातील पौष्टिक घटक जेवणासोबत पोटात गेल्याने त्याचा शरीराला फायदा होतो.
गरम जेवण केळीच्या पानावर वाढल्यानंतर त्याचा वासही जेवणात मिसळा जातो. त्यामुळे जेवताना प्रसन्न वाटते.
जेवण सुरक्षित
केळीच्या पानातील अॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म बॅक्टेरियांचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात. लांबच्या प्रवासातही केळीच्या पानात अन्न पदार्थ गुंडाळून नेल्याने ते अधिक सुरक्षित राहतात.
सौंदर्याला फायदेशीर
नियमित केळीच्या पानावर खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारायला मदत होते. ते अधिक चमकदार होतात.
प्रदूषण वाढवत नाही
केळीचं पान पर्यावरणाला पुरक आहे. त्यामुळे केळीच्या पानावर जेवल्याने पाण्याची बचत होते सोबतच त्याचे विघटन होणेही सोप्पे आहे.