fbpx

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- नितीन काळे

आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क

कारी : उस्मानाबाद तालुक्यातील अंबेजवळगे गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व फळबागांची पाहणी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली. अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या, सोयाबीन पिकाबरोबर फळबागांचे ही पंचनामे करावेत असं त्यांनी सांगितले.भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर ,भाजप सरचिटणीस अँड नितीन भोसले, अंबेजवळगे गावचे सरपंच आनंद कुलकर्णी,, माजी सरपंच अतुल देशमुख, माजी सरपंच सत्यवान चांदणे ग्रा. पं. सदस्य बालाजी जाधव,ग्रा. पं. सदस्य विनोद वायकुळे, अक्षय नाईकवाडी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *