कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: महाराष्ट्र विधानसभा सभागृहामध्ये तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले. आशिष शेलार, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, संजय कुटे, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, किर्तीकुमार बागडिया, नारायण कुचे या आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घ्या, बार्शीत भाजप कार्यकर्ते आक्रमक
या घटनेचा व हंगामी अध्यक्षांनी सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप करत भाजपा बार्शी तालुक्याच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. दडपशाही पद्धतीने भाजपाचे १२ आमदार महाविकास सरकारकडून निलंबित करण्यात आलेले आहे, ते तात्काळ मागे घेण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप च्या वतीने देण्यात आला. यावेळी भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष ॲड. राजश्री डमरे, भाजपा अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शकील मुलाणी, प्रसिद्धी प्रमुख किरण कोकाटे, सुदीप पाटील, विक्की जव्हेरी, मुकुंद यादव आदी उपस्थित होते.