कुतूहल न्यूज नेटवर्क
यावली येथे महिला दिन उत्साहात साजरा
वैराग (काशीनाथ क्षीरसागर) : यावली ता.बार्शी येथे सोलापूर जिल्हा मध्य.सह.बँक शाखा मालवंडी व ग्रामपंचायत यावली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिनानिमित्त नवनियुक्त महिला सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच रुपाली तुरे, उपसरपंच निवेदिता उकरंडे, सदस्या माधुरी उबाळे, सुवर्णा सरवदे, वैशाली गायकवाड या महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी डिसीसी बँक शाखा मालवंडीचे शाखाधिकारी एच.एम.मारकड, क्लार्क सी.व्ही.पवार, डी.टी.पाटील, सेवक के.आर.देशमुख, यावली वि.का.सेवा सोसायटीचे सचिव सुभाष तिकटे, माजी सरपंच प्रल्हाद तुरे, भागवत उकरंडे, ग्रा.पं.सदस्य अमित सरवदे, आप्पा मांजरे, जब्बार बागवान, शरद काकडे, संगणक परीचालक हर्षद ढोरे, प्रा.रमेश काकडे, ग्रा.पं.कर्मचारी राजेंद्र चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार निलेश उबाळे यांनी केले.