कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: मळेगांव (ता. बार्शी) येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच ज्योती माळी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, स्मशानभूमी येथे सरपंच माळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
मळेगांव येथे महिला दिन उत्साहात साजरा
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बस स्थानकात व स्मशानभूमीत बाकडे बसविण्यात आले. याप्रसंगी माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गांगुताई माळी, रजनी मुंबरे, जि. प.शाळेच्या शिक्षिका सुलभा नादवटे, कांता थोरात, अंगणवाडी सेविका सविता सरवदे, आश्विनी दळवी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बावीच्या विजया विभुते, आशा वर्कर पूजा बोधले, आश्विनी नलावडे, अलका मोरे आदी मान्यवरांसह महिला यावेळी उपस्थित होते.