कुतूहल न्यूज नेटवर्क
माढा: सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरांमध्ये नियमित दरवर्षीप्रमाणे कुपवाड केसरी या मानाच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथे पार पडलेल्या अंतिम सामन्यात जवळजवळ दहा मिनिटे चाललेल्या अत्यंत चुरशीच्या कुस्तीमध्ये पैलवान अब्दुल पटेल यांनी वारण्याच्या पैलवानाचा दुहेरी पट काढून प्रतिस्पर्धी पैलवानस अस्मान दाखवत कुपवाड केसरी चे मानकरी ठरण्याचा मान मिळवला आहे. कुपवाड केसरीचे मानकरी म्हणून त्यांना १ किलो चांदीची गदा, आणि २५ हजार रुपये रोख अशा स्वरूपात बक्षीस मिळाले.
अंजनगाव उमाटे येथील पैलवान अब्दुल पटेल ठरले कुपवाड केसरीचे मानकरी
कुपवाड केसरी या मानाच्या गदेचे मानकरी ठरल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातून आणि पंचक्रोशीतून त्याचप्रमाणे राज्यातील विविध कुस्ती शौकीनाकडून त्यांचे विशेष कौतुक होताना दिसून येत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून कुस्ती क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवत त्यांनी मिळवलेले हे यश गावांमधील आणि पंचक्रोशीतील पैलवानासाठी एक वरदायिनी आणि दिशा देणारे ठरेल यामध्ये कोणतीही तिळमात्र शंका असण्याचे कारण वाटत नाही.
मानाच्या मिळालेल्या या पहिल्या गदे पासून ते कुस्ती खेळणाऱ्या प्रत्येक पैलवानाच्या स्वप्नातील महाराष्ट्र केसरीच्या गदे पर्यंतचा आपला कुस्तीच्या प्रवासाचा आलेख असाच उत्तरोत्तर चढत राहील व एक दिवस आपण महाराष्ट्र केसरी गदा मिळवून अंजनगाव उमाटे गावचे नाव महाराष्ट्राच्या पटलावरती आणण्याचे कार्य कराल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. समीर पठाण, महाराष्ट्र पोलीस.
- (Wrestler Abdul Patel from Anjangaon Umate became the mankari of Kupwad Kesari)