कुतूहल न्यूज नेटवर्क
सेतू कार्यालयातील गैरव्यवहार व ग्राहकांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीबाबत सेतू टाळेबंद करण्याचा युवा भिम सेनेचा इशारा
मोहोळ : युवा भिम सेनेच्या वतीने मोहोळ येथील सेतू कार्यालयातील गैरव्यवहार व ग्राहकांची आर्थिक लुट होत असल्याच्या कारणावरून तहसीलदार यांना दि.२१ आज रोजी निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये, मोहोळ शहरातून व ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, सामान्य नागरिक यांची सेतू मध्ये प्रचंड प्रमाणात पिळवणूक होत असून उत्पन्न दाखला, अॅफिडेव्हिट, जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे वेळेवर मिळत नसून शासन फि व्यतिरिक्त ज्यादा पैसे घेऊन लुटमार होत आहे. संबंधित दाखले वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे नागरिकांचे आर्थिक लूटीबरोबर प्रचंड हाल होत आहेत.
तहसीलदार यांनी स्वतः जातीने लक्ष घालून सदर प्रकार थांबवून त्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच तपशीलवार रकमेचे बोर्ड दर्शनी भागावर लावण्यात यावेत. अन्यथा कोणत्याही क्षणी युवा भिम सेनेच्या वतीने सेतू कार्यालय टाळेबंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी युवा भीमसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.