कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत आठ जणांवर पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथे युवकाची आत्महत्या; आठ जणांवर गुन्हा
अजय बळीराम गिराम (वय १९) याने आठ जणांच्या त्रासास कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी त्याची आई मंदाकिनी बळीराम गिराम (वय ४०) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये म्हटले आहे की, त्या ११ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास कारी शिवारातील त्यांच्या शेतात आपल्या दोन मुलासह काम करत असताना आठ जण चारचाकी गाडीने तेथे आले. मुलगा अजय यास मोठमोठ्याने शिवीगाळी करू लागले. मुलगा अजय यास शेतातून ओढत बांधावर नेऊन हणुमंत कोंढारे व इतर लोक तूला लय माज आला आहे का असे म्हणाले. हणुमंत कोंढारे ने केबल वायरने तसेच इतर लोक काठीने व लाथा बुक्यांनी मारहाण करू लागले. त्यावेळेस फिर्यादी व मुलगा अभिषेक यांनी तुम्ही माझ्या मुलाला मारू नका असे म्हणले असता, तुला पण जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवुन ते निघून गेले. यापुर्वीही तीन ते चार महिन्यापासून मुलास शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत होते.
फिर्यादीचा मुलगा अजय याने हणुमंत ऊर्फ आबा ज्ञानदेव कोंढारे व इतर पाच इसमांचे त्रासास कटांळुन घरात ठेवलेली किटक नाशक औषध प्राशन केले. त्यानंतर त्यास औषध उपचार करता प्रथम उस्मानाबाद सिव्हिल हॉस्पीटल व त्यानंतर पुढील औषध उपचारा करता सिव्हिल हॉस्पीटल सोलापूर येथे दाखल केले असता औषध उपचारा दरम्याण १३ जुलै रोजी रात्री १०:३० वाजता तरूणाचा मृत्यू झाला आहे. या तक्रारीवरून संशयित आरोपी हणुमंत ऊर्फ आबा कोंढारे, सुभाष शिंदे, रामा वाकडे, विशाल ऊर्फ सोन्या मोरे, धिरज मोरे, सुनिल ऊर्फ भैया मोरे, सागर मोरे व रामलिंग ऊर्फ आबा मोरे (सर्व रा.गोरमाळे) यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.