कुतूहल न्यूज नेटवर्क
युगदर्शक बार्शी आयकॉन पत्रकारिता पुरस्कार मयूर गलांडे यांना जाहीर
बार्शी, दि.९ : युगदर्शक परिवारातर्फे देण्यात येणारा यंदाचा युगदर्शक बार्शी आयकॉन पत्रकारीता २०२० हा मानाचा पुरस्कार लोकमत डिजिटल मीडियाचे उपसंपादक मयूर गलांडे यांना जाहीर झाला असून लवकरच त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे यंदा ८ वे वर्ष आहे. युगदर्शक बार्शी आयकॉन २०२० पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये यंदाचा पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार लोकमत डिजिटलचे महेश (मयूर) गलांडे यांना देण्यात येणार आहे. एक पेपरवाला ते उपसंपादक हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असून डिजिटल मीडियात त्यांनी बार्शीचं नावं मुंबईपर्यंत नेल्याचं युगदर्शकचे संचालक/संपादक नितीन भोसले यांनी सांगितले.
तसेच लवकरच इतर क्षेत्रातील बार्शी आयकॉन, पोलीस आयकॉन,जिल्हा आयकॉन, महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे जाहीर करण्यात येतील आणि शानदार सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडेल, असेही भोसले यांनी सांगितले.