fbpx

२० फेब्रुवारी ला युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : सालाबादप्रमाणे याहीवर्षी युगदर्शक प्रतिष्ठाणचे बार्शी आयकॉन, जिल्हा आयकॉन व महसूल आयकॉन, पोलीस आयकॉन (राज्यस्तरीय) स्तरावरती पुरस्कार देण्यात येणार असून हा युगदर्शक प्रतिष्ठाणचा सलग आठव्या वर्षात जाणारा पुरस्कार सोहळा ठरणार आहे. या सोहळ्याचे आयोजन २० फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ६:३० वा. बार्शी येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष नितीन भोसले यांनी दिली.

यावर्षी पुरस्काराच्या सलग आठव्या सोहळ्यात अकरा आयकॉन पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत ते खालील प्रमाणे राज्यस्तरावरील शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील यांना वितरीत करण्यात येणार आहे. तर जीवन गौरव – तुकाराम पाडे, महसूल आयकॉन – उस्मानाबाद निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सोलापूर जिल्हा आयकॉन – अणुजीव शास्त्रज्ञ संतोष जठार, राज्यस्तररीय पोलीस आयकॉन – पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, बार्शी युवा आयकॉन – कौस्तुभ (आण्णा) पेठकर, उद्योजक आयकॉन – वसीम पठाण, सरपंच आयकॉन – पंडीत मिरगणे, महिला आयकॉन – ॲड. राजश्री तलवाड-डमरे, क्रिडा आयकॉन – प्रमोद माळी, वैद्यकीय सेवा आयकॉन – सुविधा हॉसिपटल, पत्रकार आयकॉन – मयुर गलांडे आदी समाजधुरीनांना आयकॉन पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन २० फेब्रवारी २०२१ रोजी सायंकाळी ६:३० वा. बार्शी येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. सुधाकर बोकेफोडे उपस्थित राहणार आहेत.तर प्रमुख उपस्थिती मध्ये बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी, तहसिलदार प्रदिप शेलार, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, पोलिस उपअधिक्षक अभिजीत धाराधिवकर, मुख्याधिकारी अमिताताई दगडे पाटील, मंगळवेढा नगरपरिषद मुख्याधिकारी निशीकांत परचंडराव, दै. पंढरी भूषणचे संपादक शिवाजी शिंदे, उद्योजक सुनिल भराडिया, माधवबाग संचालक डॉ. पवन कोळी, उद्योजक राहुल कोंढारे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीप सोपल हे असणार आहेत. यावेळी सुधीर खाडे, सावता परिषद अध्यक्ष दिनेश नाळे, माऊली नाळे, शितल नाळे, पोलीस पाटील महेंद्र पाटील, सचिन गायकवाड, श्रीकृष्ण उपळकर, नरेश ठाकूर, उदय पोतदार, जाधवर, गिरीष कुलकर्णी, गुरु साखरे, किरण भिसे, विशाल नवले, गणेश मोरे, गणेश शिंदे, पंडीत शिंदे, विशाल भोसले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *