आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
खरीपाचे दु:ख विसरुन वापसा होताच रब्बी पेरणीला सुरवात
कारी प्रतिनिधी : यंदा अतिवृष्टी तसेच परतीच्या जोरदार पावसाने खरिपासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.असे असलेतरी रब्बी हंगाम मात्र जोरात येण्याची शक्यता आहे,त्यामुळे वापसा होताच बार्शी तालुक्यातील पांगरी व उस्मानाबाद तालुक्यातील कारी परिसरात रब्बीची पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. शेतकरी ट्रॅक्टर द्वारे जमिनीची मशागत करीत आहेत तर काही शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभरा पेरणीला सुरुवात केली आहे.सध्या शेतकरी शेतीकामात मग्न झाले आहेत.