fbpx

शहरातील झाडांना खिळ्यांचा विळखा ; प्रशासनाचे दुर्लक्ष

दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क

निगडी : पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडांचे महत्वाचे योगदान असताना पिंपरी-चिंचवड शहरातील जाहिरातबाजांना त्याचा विसर पडला आहे. चौकात, इमारतीच्या भिंतीवर,बस किंवा ऑटोवर जाहिराती लावायची दैनंदिन बाब असला तरी झाडांना खिळे ठोकून जाहिराती लावले जात असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींचे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

शहरात दरवर्षी महापालिका व अनेक सामाजिक संस्थांकडून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जातो. तर दुसरीकडे परिश्रम, मेहनतीने वाढविण्यात आलेल्या वृक्षावर खिळे ठोकून जाहिरात फलक लावण्यात येते. फ्लेक्स लावण्यात अडथळा निर्माण झाल्यास प्रसंगी झाडांच्या फांद्याही छाटल्या जातात. यामुळे शुद्ध हवा,आणि शितल सावली मिळविण्यासाठी लावण्यात आलेल्या झाडांची वाढ खुंटते आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.

पर्यावरण संरक्षण करण्यात झाडांचा महत्त्वाचा वाटा आहे.शहरवासीयांना सावली देणाऱ्या वृक्षांच्या होत चाललेल्या खराबीला जाहिरातीबाज जबाबदार आहेत. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देवून त्यांच्यावर कारवाई करावी आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लावावा अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमींनी कुतूहल न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *